
आमदार म्हणजे पक्ष होत नाही ; शरद पवार !
बातमीदार | २६ ऑगस्ट २०२३ | राज्यात गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांच्या भुमिकेमुळे मोठी चर्चे सुरु होती आज पुन्हा शरद पवारांनी ठणकावून सांगितले आहे. ते म्हणाले कि, काही आमदारांनी वेगळी भूमिका मांडली म्हणून पक्ष फुटला असे म्हणता येत नाही. कारण पक्ष म्हणजे आमदार नव्हे, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.
राष्ट्रवादीचे दोन प्रदेशाध्यक्ष आहेत, ही फूट नाही तर काय? असा सवाल काँग्रेस नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. तर, संजय राऊत यांनीही अजित पवार गटाने पक्षाच्या अध्यक्षपदावरून शरद पवारांची हकालपट्टी केली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातही शिवसेनेप्रमाणे फुट पडली असल्याचे आम्ही मानतो, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर मी राष्ट्रवादीचा प्रमुख आहे. माझ्या पक्षाचे धोरण मी सांगतो, असे शरद पवारांनी सुनावले. तसेच, राष्ट्रवादीत फूट असल्याचा दावाही पुन्हा फेटाळून लावला.
शरद पवार म्हणाले, पक्ष म्हणजे काय? फूट याचा खरा अर्थ काय? हे तुम्ही समजावून घ्या. पक्ष म्हणजे आमदार नव्हे तर पक्ष ही संघटना असते. देश पातळीवर ज्याच्या हाती पक्षाची संघटना पक्ष त्याचा. आता राष्ट्रवादी पक्ष, संघटनेचे अध्यक्ष इथे तुमच्यासमोर बसलेले आहेत. देशाच्या संघटनेचे अध्यक्ष तुमच्यासमोर आहेत. पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील हे आहे.
शरद पवार म्हणाले, आमच्यापासून काही आमदार वेगळे झाले ही वस्तुस्थिती आहे. मात्र, त्यांनी फक्त पक्षाच्या विचारसरणीहून वेगळी भूमिका घेतली असे म्हणता येईल. ते आमदार काही पक्षातून फुटून गेले नाहीत. तुम्हीच आठवून बघा तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही कोणाची प्रतिक्रिया घेत होतात. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही कोणाची प्रतिक्रिया घेत होतात? तसेच, आमचे काही सहकारी आम्हाला सोडून गेले तेव्हा त्यांची पहिली पत्रकार परिषदही आठवून पाहा. पक्षाचा अध्यक्ष शरद पवार असल्याचेच त्यांनी सांगितले होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम