चार हजारांवर भाव देणे शक्य नाही ; मंत्री गिरीश महाजन !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ ऑगस्ट २०२३ | देशासह राज्यात कांदा उत्पादक मोठ्या संकटात आले असून त्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार बैठकीचे आयोजन देखील करीत आहे तर दुसरीकडे राज्यातील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच शनिवारी स्पष्ट केले.

मंत्री महाजन म्हणाले कि, नाफेडला थेट बाजारात जाण्यासाठी तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे त्यांना सरसकट कांदा खरेदी करणे शक्य नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात नाशिकच्या शेतकरी, व्यापारी प्रतिनिधींची बैटक घेतली जाईल. त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, असेही महाजन म्हणाले.

गिरीश महाजन म्हणाले की, यंदा कमी पाऊसमान झाल्यामुळे भविष्यात कांद्याचे उत्पादन कमी होईल. कांद्याची निर्यात झाली, तर देशात कांदा टंचाई निर्माण होऊन कांद्याची भाववाढ होण्याची भीती नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेवून केंद्राने शेतकरी व ग्राहक हितास प्राधान्य देवून कांदा निर्यातीवर शुल्क आकारले आहे. पण त्यानंतरही शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी नाफेड व एन सी सी एफ यांच्यामार्फत 2410 रूपये प्रति क्विंटल दाराने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केली जात आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात 40 कांदा खरेदी केंद्र सुरू असून अजून 10 खरेदी केंद्र वाढवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला करण्यात आल्या आहेत. नाफेडच्या माध्यमातून आतापर्यंत 4 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला. नाफेडचे खरेदी केंद्र वाढवण्याचे आदेशही देण्यात आलेत. पुढील काळात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना कायमस्वरुपी मदत कशी करता येईल, साठवण क्षमता कशी वाढवता येईल, भाव स्थिर कसे ठेवता येतील, या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम