अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी १ कोटीची निविदा
दै. बातमीदार । १६ ऑक्टोबर २०२२ । राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्ट अनधिकृत ठरवत ते पाडण्यासाठी आता सार्वजनिक बाधकाम विभागाला तब्बल १ कोटी रुपये खर्च येत असल्याने त्याची जाहीर निविदाच काढावी लागत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनाऱ्यावरील अनिल परब यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्ट पाडण्यासाठी आणि ढिगाऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे ९२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तसा अंदाजपत्रकीय प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. मात्र या वेळी महसूल, पोलिस सुरक्षा आदींसाठी लागणारा खर्च अंदाजित खर्च १ कोटीवर जाणार आहे. दोन रिसॉर्ट पाडण्यासाठी पूर्वी कन्सल्टंटची नेमणूक करण्यासाठी जाहीर निविदा काढली होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम