अंजू पुन्हा भारतात परतणार ; नेमके पाकिस्तानात घडले काय ?

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ सप्टेंबर २०२३

गेल्या काही महिन्यापासून एक तरुणी मोठ्या चर्चेत आली होती. अंजू भारतातून पाकिस्तानात गेली होती. ती आता पुढील महिन्यात पुन्हा भारतात परतणार असल्याचा दावा, तिचा नवा पती नसरुल्लाहने केला आहे. अंजू मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून, तिला तिच्या दोन्ही मुलांची प्रचंड आठवण येत आहे. यामुळे ती पुढच्या महिन्यात भारतात परत आहे, असे नसरुल्लाहने म्हटले आहे.

राजस्थानातील अल्वर येथील रहिवासी असलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिची नवी ओळख फातिमा अशी आहे. तिने 25 जुलैला आपला 29 वर्षीय बॉयफ्रेंड नसरुल्लाहसोबत लग्न केले. नसरुल्लाहचे घर खैबर पख्तूनख्वाच्या अप्पर दिर जिल्ह्यात आहे. हे दोघेही 2019 मध्ये फेसबुक फ्रेंड बनले होते. पीटीआय या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नसरुल्लाह म्हणाला, ”फातिमा (अंजू) पुढील महिण्यात भारतात परतत आहे. ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून, तिला तिच्या मुलांची प्रचंड आठवण येत आहे. यामुळे परतण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाही.”

अंजूचे पहिले लग्न राजस्थानातील रहिवासी अरविंदसोबत झाले होते. त्यांना 15 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांचा मुलगाही आहे. नसरुल्लाह म्हणाला, अंजूचे मानसिक आरोग्य चांगले रहावे, अशी माझी इच्छा आहे. यामुळे तिने तिच्या मुलांना भेटण्यासाठी तिच्या देशात जाणेच योग्य ठरेल. पाकिस्तानातील कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती परतेल. तसेच, या प्रक्रियेला काही वेळ लागेल. ती साधारणपणे पुढील महिन्यात भारतात पोहोचेल. तर व्हिसा मिळाला तर आपणही भारतात येऊ. अंजू आणि नसरुल्लाह गेल्या महिन्यात लग्नानंतर पहिल्यांदाच पेशावरला गेले होते. त्यांनी तेथे दिवंगत दिलीप कुमार आणि शाहरुख खानची घरं पाहिली. अंजू म्हणाली, मी काही पश्तो शब्दही शिकले आहेत. एवढेच नाही, तर येथे येण्यापूर्वी मलावाटले नव्हते की, मला येथे एवढी प्रसिद्धी मिळेल, असेही अंजू म्हणाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम