अभिनेत्री मौनीच्या व्हिडीओने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ सप्टेंबर २०२३ बॉलीवूड क्षेत्रात नेहमीच चर्चेत असलेले नाव म्हणजे अभिनेत्री मौनी रॉय हि अभिनेत्री नेहमीच हटके स्टाईल आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. सोशल मीडियावर सक्रीय असणारी मौनी रॉय प्रत्येक वेळी नवीन नवीन लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. नुकताच मौनी रॉयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मौनीचा कातिल अंदाज सर्वांना पाहायला मिळत आहे.

मौनी रॉयने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या लूकमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे. मौनी रॉयने या व्हिडिओ आणि फोटोमध्ये डिझायनर शॉर्ट वनपीस परिधान केला आहे. मौनी या लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे. मौनीने कातिल अंदाज दाखवत जबरदस्त डान्स मूव्स देखील केले आहेत. मौनीच्या या ड्रेसवर हिऱ्यांची डिझाइन तयार करण्यात आले आहे.
डिप नेक असलेल्या या ड्रेसमधील मौनीचा किलर लूक चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या व्हिडीओमध्ये मौनी रॉय इंग्रजी गाण्यावर जबरदस्त पोझ देताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत मौनीने कॅप्शनमध्ये ‘A Lil’ असे लिहिले आहे. मौनी रॉयच्या या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली असून ते कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. मौनीच्या हा हॉट व्हिडीओमुळे सोशल मीडियाचे तापमान चांगलेच वाढले आहे.

 

दरम्यान, अभिनेत्री मौनी रॉयने एकता कपूरच्या ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. मौनीने टेलिव्हिजनपासून बॉलीवूडपर्यंतचा बराच पल्ला गाठला आहे. ‘नागिन’ या मालिकेतून मौनी रॉय घराघरात पोहचली. यानंतर तिने अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ आणि अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये काम केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम