ठाकरे गटाचे आणखी एक नेता शिंदेंच्या शिवसेनेत होणार दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ जून २०२३ ।  राज्यातील ठाकरे गटाच्या शिवसेनेला सोडून अनेक नेते शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत असतांना आज पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे असल्याचे सूचक ट्विट शिंदे गटाकडून करण्यात आलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी हे ट्विट केलं आहे.

आज ‘उबाठा’चा आणखी एक मोहरा कमी होणार आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून तो खऱ्या विचारांशी निष्ठा राखणार आहे. खरा कार्यकर्ता हा कधीही ठाकरे गटासोबत राहू शकत नाही, अशा अशायाची एक कविता नरेश मस्के यांनी ट्विट केली आहे. नरेश मस्के यांनी काय म्हटलं? नरेश मस्के यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

 

आता ठाकरे गटातून शिंदे गटात नेमका कोणता नेता प्रवेश करणार आहे? याची चर्चा सुरू झाली आहे. नरेश मस्के यांनी ट्विटच्या माध्यमातून ठाकरे गटाला जोरदार टोला लगावला आहे. खरा कार्यकर्ता हा कधीही ठाकरे गटासोबत राहू शकत नाही. आज ‘उबाठा’चा आणखी एक मोहरा कमी होणार आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून तो खऱ्या विचारांशी निष्ठा राखणार आहे, अशा अशायाच ट्विट नरेश मस्के यांनी केलं आहे. दरम्यान यापूर्वी देखील शिवसेना ठाकरे गटातून अनेक जणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. कायंदेंनंतर आता आणखी कोणता नेता शिवसेना शिंदे गटात जाणार असा प्रश्न मस्के यांच्या ट्विटनंतर उपस्थित केला जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम