चंदीगडनंतर अजून एक एमएमएस कांड; संशयितास अटक
दै. बातमीदार । २० सप्टेंबर २०२२ । चंदीगड विद्यापीठाच्या विद्यार्थिनींचे एमएमएस प्रकरण ताजे असतानाच यात आयआयटी मुंबई येथेही काहीसा असाच प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे.
आयआयटी बॉम्बे येथील एका विद्यार्थिनीने पवई पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून, रविवारी रात्री एका कॅन्टीन कर्मचाऱ्याने वसतिगृह १० (H10) च्या बाथरूमच्या खिडकीतून तिचा व्हिडिओ चित्रित केला होता.
याप्रकरणी, २२ वर्षीय कॅन्टीन कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, परंतु संबंधित आरोपीच्या मोबाईलमध्ये असा कोणताही व्हिडीओ आढळला नसून, पोलीस सखोल तपास करीत आहेत.
दरम्यान, आयआयटी बॉम्बेचे डीन प्रोफेसर तपनेंदु कुंडू यांनी जारी केलेल्या जबाबात, आम्ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, बाहेरून बाथरूमपर्यंत जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर लाईट्स व सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आलेले आहे. आता कॅन्टीन केवळ महिला स्टाफ नेमल्यावरच सुरू करणार असल्याचे नमूद केले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम