राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक ; महिलेचा मृत्यू !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ एप्रिल २०२३ ।  देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याने देशासह अनेक राज्यातील नागरिक भयभीत झाले आहे. त्यामुळे दिवसेदिवस याची संख्या वाढ होत आहे. त्यातील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना सोमवारी राज्यात ३२८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले. त्यात मुंबईतील ५१ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच २४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे, तर मुंबईतही सोमवारी ९५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून २८ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

५ रुग्णांना ऑक्सिजन बेड्सवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या मुंबईत १०२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून, सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या १४५४ इतकी असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम