आजपासून करा अर्ज ; देशात मोठी बंपर भरती !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जानेवारी २०२३ । देशातील पोलीस भरतीसाठीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणांना मोठी संधी आली आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सने एक अधिसूचना जारी करून बंपर पदासाठी भरतीची घोषणा केली आहे.

अधिसूचनेनुसार, Central Industrial Security Force मध्ये 451 कॉन्स्टेबल/ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर पदांची भरती (Vaccancy) केली जाईल. ज्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल. 23 जानेवारी 2023 पासून उमेदवार या भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतील. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट www.cisfrectt.in द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतील. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे.

रिक्त जागांचा तपशील – अधिसूचनेनुसार, 451 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे. त्यापैकी 183 रिक्त जागा कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि 268 रिक्त जागा कॉन्स्टेबल/ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर पदांसाठी आहेत.

शैक्षणिक पात्रता – भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा – या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 27 वर्षे दरम्यान असावं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम