अर्चना व कार्तिकचा रोमान्स व्हिडीओ झाला व्हायरल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ जानेवारी २०२३ । गेल्या काही दिवसापासून सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झालेले बिग बॉसच्या घरातील या रियॅलिटी शो ने नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता हा रियॅलिटी शो शेवटच्या टप्प्यात आला असून त्यामध्ये काही बॉलीवूडचे सेलिब्रेटी देखील सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.

बिग बॉसचा १६ वा सीझन शेवटाकडे आला असून यावेळी बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शो मध्ये हजेरी लावताना दिसत आहे. सध्याच्या घडीचा आघाडीचा कलाकार कार्तिक आर्यननं देखील बिग बॉसमध्ये हजेरी लावली आणि तो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे. कार्तिक आर्यन आणि बिग बॉसच्या घरातील चर्चेतील स्पर्धक अर्चनावर कौतूकाचा वर्षाव होतोय.

कार्तिक आर्यनचा पुढील महिन्यात शहजादा नावाचा चित्रपट येतो आहे. त्याच्या प्रमोशनसाठी तो बिग बॉसमध्ये सहभागी झाला होता. यावेळी कार्तिकनं जे काही केलं त्याची चर्चा सुरु झाली आहे. काहींनी कार्तिकला ट्रोल केले आहे. तर काहींनी त्या दोघांवर कौतूकाचा वर्षाव सुरु केला आहे. एकानं तर कार्तिक तुला असा रोमान्स करताना काही वाटले नाही का असा प्रश्न केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम