मनसेचे नेते मोरे नाराज ? ; घरातून पाहिली सभा !
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच ६ रोजी रत्नागिरीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे शनिवारी (६ मे) झालेल्या जाहीर सभा मोठ्या उत्साहात झाली यावेळी सभेला पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांची अनुपस्थिती होती. मोरे यांनी घरातूनच टीव्हीवर राज यांचं भाषण पाहिलं. त्यामुळे पुन्हा एकदा मोरे मनसेवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहे.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातील राज यांच्या सभेसाठी येत असलेल्या मनसैनिकाच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती दिली. त्यामध्ये, एक मनसैनिक ठार झाल्याचं सांगताना, सर्वांनी नीट गाडी चालवण्याचं आवाहन केलं. तसेच, घरी जातानाही व्यवस्थित जावा, असेही सूचवले. राज यांच्या या सभेसाठी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणाहून आणि पुण्यातूनही मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आले होते. पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मात्र, या सभेला हजेरी लावली नाही. मोरेंनी घरातच टिव्हीवरुन राज यांची सभा पाहिली. तर, सभेला न जाण्याचं कारणही त्यांनी ट्विट करुन सांगितलं.
माझ्या सख्या भाचीचे उद्या लग्न असल्यामुळे मला रत्नागिरीच्या सभेला जाता आले नाही,
पण मी संपूर्ण सभा आज बहिणीच्या घरी बसूनच पाहिली,
खुप छान मुद्दे घेतले साहेबांनी आज…#RajThackeray pic.twitter.com/OfUMUSg2rp— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) May 6, 2023
माझ्या सख्या भाचीचे उद्या लग्न असल्यामुळे मला रत्नागिरीच्या सभेला जाता आले नाही. पण, मी संपूर्ण सभा आज बहिणीच्या घरी बसूनच पाहिली, खुप छान मुद्दे साहेबांनी घेतल, असे म्हणत मोरे यांनी राज यांच्या सभेचं कौतुक केलयं. दरम्यान, वसंत मोरे यांना पक्षात डावललं जात असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. पुण्यात मोरेंना डावलून साईनाथ बाबर यांना अध्यक्षपद दिल्यामुळे ते नाराज झाल्याची चर्चाही रंगली होती. त्यातूनच, ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात जातील, अशीही चर्चा होती. मात्र, आपण राज ठाकरेंसोबतच कायम राहणार असल्याचं वसंत मोरे यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम