तुमचे केसगळती होतेय का ? जाणून घ्या सविस्तर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ नोव्हेबर २०२२ वर्षभरात बदलत्या ऋतूमुळे तुमच्या शरीरावर देखील अनेक बदल जाणवायला लागत असतात, हे बदल काही चांगले असतात तर काही वाईट असतात. असाच एक बदल म्हणजे केसगळती . हि समस्या लहान मुलांपासून ते महिला, पुरुषांमध्ये होते. अधिकतर महिलांमध्ये केसगळतीचा त्रास जास्त जाणवतो. मात्र, केसगळती फक्त बदलत्या ऋतुमुळे होत नाही. तर यामागेही अनेक कारणे आहेत. केसगळतीची समस्या का होते? यामागे नेमकी कोणती कारणे आहेत आणि केसगळतीवर उपचार काय?

केस गळतीच्या समस्येबाबत सांगताना डॉ. इरफाना पाटील, त्वचारोगतज्ज्ञ म्हणतात की, केस गाळण्याची असंख्य करणे आहेत. पण त्यामध्ये प्रामुख्याने Seasonal variation मुळे तर काही तीव्र आजाराने जसे की, कोरोना, चिकनगुनिया, डेंग्यु, मलेरिया, डायबिटीस आणि कॅन्सर यांसारख्या आजारामुळे देखील तुम्हाला केसगळतीचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे शरीरावर अतिरिक्त तणावामुळे तसेच सर्जरीमुळे देखील तुम्हाला केसगळतीचा सामना करावा लागतो. या समस्येला ‘Acute Telogen Effluvium’ असे म्हणतात.

केसगळतीचं प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आहे. यात प्रामुख्याने कारण म्हणजे, गर्भधारणेनंतर शरीरात होणारे हार्मोनल चेंजेस, जसे की, थायरॉईड, यामुळे देखील केसगळती होण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, यामध्ये सर्वात प्रकर्षांने मुलींमध्ये जाणवणारी समस्या म्हणजे, हार्मोनल असंतुलन यामुळे देखील अनेक महिलांना केसगळतीचा त्रास होतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम