स्वातंत्र्य दिन साजरा होताच ‘या’ देशात पेट्रोलसह डीझेल दरात वाढ !
बातमीदार | १६ ऑगस्ट २०२३ | जगभरात महागाईत मोठी वाढ होत असतांना आता पाकिस्तान मध्ये स्वातंत्र्य दिन साजरा झाल्या झाल्या दुसऱ्याच दिवशी पेट्रोलियम पदार्थांच्या किमती प्रति लिटर वीस रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. घोषणेनंतर पेट्रोल प्रति लिटर साडे सतरा रुपये आणि डिझेल वीस रुपयांनी वाढले आहे. नवीन दरा नुसार आता पेट्रोल २९०.४० रुपये तर डिझेल २९३ रुपये लिटर इतके महागले आहे.
रशियाचे कच्चे तेल हे पाकिस्तान सरकारला पाकिस्तानात आणता आले नाहीये. पाकिस्तान सरकारने हे तेल हे चांगल्या गुणवत्तेचे नसल्याचे म्हटले आहे. यामुळे पाकिस्तानातील रिफायनरी कंपनी रशियाहून आलेले तेल रिफाईन करायला नकार देत आहेत. पाकिस्तान सध्या खूप खराब अवस्थेत आहे. अर्थशास्त्रांच्या मते कित्येक वर्षापासून वाईट फायनान्स मॅनेजमेंटमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची अशी स्थिती झाली आहे. याचबरोबर कोरोना महामारी, वैश्विक ऊर्जा संकट या कारणामुळे पाकिस्तानची हालत अजूनच वाईट होत गेली. पाकिस्तानच्या सरकारने केलेली ही घोषणा 21 जुलैला करण्यात येणार होती. मात्र त्यावेळेसही आधीच महाग असलेले दर अजून वाढवुन नागरीकांना त्रास नको असे त्यावेळी अधिकाऱ्यांचे मत होते. मात्र अखेर 16 ऑगस्ट पासून पेट्रोल दरवाढ करण्यात आली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम