शाहरुखचा अपघात होताच गौरी पोहचली अमेरिकेत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ जुलै २०२३ ।  प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा नुकताचा अमेरिकेतील एका सिनेमाच्या शुटींगसाठी गेला असता तिथे त्याचा अपघात झाला. अपघातात त्यांच्या नाकाला गंभीर इजा झाली. त्याच्या नाकाची छोटी सर्जरी करण्यात आली. अमेरिकेत योग्य ते उपचार घेतल्यानंतर शाहरूख खान नुकताच भारतात पोहोचला आहे. मुंबईतील एअरपोर्टवर शाहरूखला स्पॉट करण्यात आलं. सर्जरीनंतर शाहरूख खान थोडा दमललेल्या अवस्थेत दिसला. शाहरूखबरोबर पत्नी गौरी खान आणि छोटा मुलगा अबराम खान देखील अमेरिकेत होते.

सर्जरीनंतर तिघेही भारतात परतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरूख खान एमिरेट्स फ्लाइटने भारतात आला आहे. ही फ्लाइट दुबईहून थेट मुंबईत येते. शाहरूख खान मुंबई एअरपोर्टवर येताच त्याला पापाराझींनी घेरलं.

शाहरूखच्या तब्येतीची विचारपूस केली असता त्याने उत्तर देणं टाळलं. मोठ्या घाईघाईनं तो एअरपोर्टवरून निघाला. एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या शाहरूखनं निळ्या रंगाची हुडी आणि कॅप कॅरी केली होती. शाहरूख दमलेला असला तरी फिट दिसत होता. त्याला पाहून त्याच्या चाहत्यांच्या जीव भांड्यात पडलाय. अमेरिकेतील लॉस एंन्जिलिसमध्ये शाहरूखच्या नव्या सिनेमाचं शुटींग सुरू होतं. शुटींग दरम्यान सेटवर शाहरूखचा अपघात झाला आणि त्याच्या नाकाला जबरदस्त मार बसला.नाकातून रक्त येऊ लागलं. त्यानंतर त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

रुग्णालयात गेल्यानंतर दुखापत फार गंभीर नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं मात्र रक्त थांबल्यानंतर शाहरूखच्या नाकाची छोटी सर्जरी करण्यात आली. शाहरूख अमेरिकेत नेमकं कोणत्या सिनेमाचं शुटींग करत होता याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अपघातानंतर सिनेमाचं शुटींग थांबवल्याचं म्हटलं जातंय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम