‘हे’ आधीपासून सर्व ठरवून सुरु असणार ; राज ठाकरे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ जुलै २०२३ ।  राज्यातील शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत सत्तेसाठी झालेली बंडखोरीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

राज ठाकरे म्हणाले कि, राज्यात सध्या जे काही सुरू आहे ते किळसवाणे आहे. घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं काहीच समजत नाही. मात्र हे काही अचानक घडलेले नाही तर फार आधीपासून ठरलेले असावे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एनसीपीतील घडामोडीवर केली. दुसरीकडे दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांसोबत जाणाऱ्यातले नाहीत. त्यामुळे या सर्व घडामोडी शंकास्पद असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले. पुणे येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज ठाकरे म्हणाले की, राज्यातील राजकीय घडामोडींवर या सर्व किळसवाण्या गोष्टी आहेत असे सांगितले. अशा गोष्टी अचानक होत नाहीत. हे सगळे फार आधीपासून प्लॅन केलेले असणार. प्रफुल्ल पटेल किंवा दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्याकडे जाणाऱ्यांतले नाहीत. शरद पवार यांच्याबरोबरची ही माणसे अचानक उठतील व अजित पवारांना साथ देतील असे होणार नाही. त्यामुळे या सर्व घडामोडींमध्ये शंकेला जागा आहेत. जे झाले त्यात शरद पवार यांचा हात असण्याची शक्यताही राज ठाकरेंनी व्यक्त केली. उद्या खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही या विधानाचा देखील पुन्हा उहापोह केला.
फक्त मनसे पदाधिकारी सांगतील सध्या कोण कुठे आहे ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांबाबत सांगता येईल, बाबू वागसकर कुठे आहेत तर ते मनसेत आहेत असे सांगता येते, बाकी कोण कुठे, कोणाबरोबर आहे हे सांगणे अशक्य आहे. कॅरम एकदम कसा तरी फुटला आहे, कोणाची गोटी कोणाच्या भोकात असे सांगता येणार नाही असे राज म्हणाले. यासंबधी आपण लवकरच आयोजित मनसेच्या मेळाव्यात सविस्तर बोलू असे त्यांनी सांगितले. राज यांच्याबरोबर यावेळी मनसेचे बाबू वागसकर तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम