
नेत्याने कॉंग्रेसमध्ये प्रवेश करताच भाजपवर टीकास्त्र !
दै. बातमीदार । २१ मे २०२३ । देशातील कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेसला मोठे यश मिळाल्यानंतर देशातील अनेक भाजपसह अनेक पक्षातून नेते व कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सुरु आहे. यात आता भाजपचे नेते अशोक निंबर्गी यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. भाजपतून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर अशोक निंबर्गी यांनी भाजपवर टीका केली आहे.
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये प्रवेश दिला यांचा मला आनंद आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवानी यांच्या विचाराने भारावलेले होतो. पण मागील 7 वर्षांपासून पक्षात एकाधिकारशाही सुरू आहे. त्याला कटाळून मी भाजप पक्षातून बाहेर आलो, असं अशोक निंबर्गी यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना आवाहन केले की, एकदा सत्ता द्या सोलापूरचा कायापालट करतो. मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही. माजी महापौरांना सर्वात जास्त त्रास दिला. मात्र आज तुमची जाहीर माफी मागतो. आताची लोकशाही ही स्क्रिप्टेड लोकशाही आहे. भाजपला दोन खासदार निवडून दिले मात्र ते कधी आले आणि कधी गेले ते कळलंच नाही, असा घणाघात अशोक निंबर्गी यांनी केलाय.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम