शरद पवारांविरोधात या निवडणुकीत आशिष शेलार मैदानात

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० ऑक्टोबर २०२२ ।  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरुद्ध आशिष शेलार एमसीए अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज करणार असल्याचे सांगतिले जात आहे. त्यामुळे एमसीए अध्यक्ष पदाची निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असून एकाच मैदानावर शरद पवार यांच्या विरोधात आशिष शेलार असा सामान पाहायला मिळणार आहे.

या निवडणुकीमध्ये आशिष शेलार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मैदानात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत राजकीय नेते विरुद्ध क्रिकेटर, असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. कारण शरद पवार गटाकडून एक दिग्गज क्रिकेटपटू या निवडणुकीच्या रिंगणात आधीच उतरलाय. अशातच आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे देखील एमसीए अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ची येत्या 20 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी माजी आयसीसी आणि बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांचा गट सज्ज झाला असून विविध पदांसाठी या गटाने आपले उमेदवार निश्चित केले आहेत.पवार गटातर्फे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील हे अध्यक्षपदासाठी उभे राहणार असून उपाध्यक्षपदासाठी नवीन शेट्टी हे रिंगणात आहेत. सचिव पदासाठी तरुण आणि उच्चशिक्षित अजिंक्य नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. सहसचिव पदासाठी गौरव पय्याडे आणि खजिनदार पदासाठी जगदीश आचरेकर हे निवडणूक लढवणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम