![](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2023/09/Batmidar-1-11.jpg)
तब्बल चार वर्षांनी अश्विनी येणार मराठीत !
बातमीदार | १२ सप्टेंबर २०२३ | गेल्या काही वर्षापासून ‘सीआयडी’ या गाजलेल्या मालिकेतील डॅशिंग ऑफिसर म्हणून काम करणारी अश्विनी काळसेकर या नावाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. हिंदीमध्ये एका पेक्षा एक सरस सिनेमे करणाऱ्या अश्विनीने मराठी चित्रपटापासूनच आपली अभिनय कारकीर्द सुरू केली आहे.
हिंदीत रमलेल्या अश्विनीने २०१९ मध्ये ‘वेडींगचा शिनेमा’ या मराठी चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता चार वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा ती मराठीत झळकणार आहे. पुढल्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या एका मराठी भयपटामध्ये अश्विनी दिसणार आहे. थ्रिलर मर्डर मिस्ट्री असलेल्या या चित्रपटात अश्विनी नेमकी कोणत्या रूपात समोर दिसणार हे गुपित सध्या तरी उघड करण्यात आलेलं नाही.
![Jain advt](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2022/08/IMG_1987.jpg)
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम