खाजगी लहान वाहनांना, महामार्ग संचालनालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत टोल लागणार नाही

माजी खासदार ए टी पाटील यांच्या प्रयत्नांना यश

बातमी शेअर करा...

पारोळा

गेल्या आठ ते दहा महिन्यापासून दगडी सबगव्हण येथे सुरू झालेला हा टोल नाका टोल वसूल करीत आहे. त्यात पारोळा शहर व टोल जवळील ग्रामीण भागातील खाजगी लहान चार चाकी वाहनांना मासिक पास घेण्यास बंधनकारक करीत होते. त्यामुळे कधीकाळी एखादेवेळी प्रवास करणाऱ्या वाहनधारकाला विनाकारण टोलचा भुर्दंड बसत होता. महामार्ग अधिकाऱ्यांची निवेदने देऊन काही फरक पडत नव्हता व न्याय मिळत नव्हता. पारोळ्यातील नागरिकांनी माजी खासदार एटी पाटील यांच्याकडे भरपूर दिवसांपासून अनेकांनी तक्रारी केल्या होत्या म्हणून माजी खासदार ए. टी. पाटील यांनी गेल्या महिन्यापासून या विषयावर संबंधितांची संपर्क साधून प्रयत्न केले. तसेच नितीन गडकरी यांनी स्थानिक टोल नाका २० किलोमीटरच्या आतील वाहन धारकांना टोलचा भुर्दंड बसू नये. असे आदेश काढले आहे.

टोल व्यवस्थापक नरेंद्र खैरनार यांना तेथे पत्रकार परिषद मध्ये बोलवून पारोळा शहर व टोल नाक्यापासून ग्रामीण भागातील 20 किलोमीटरच्या आतील कोणत्याही चार चाकी धारकाला टोल लागू नये याकरिता धारेवर धरून त्यांच्याकडून तोल मुक्त असे वदळून घेतले. नरेंद्र खैरनार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, जो पर्यंत महामार्ग व्यवस्थापन यांच्याकडून आदेशाची प्रत येत नाही तो पर्यंत टोल मुक्त असेल.

यावेळी टोल व्यवस्थापक नरेंद्र खैरनार, शरद चौधरी उपस्थित होते.

तर माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. अतुल मोरे, भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, सरचिटणीस सचिन गुजराथी, माजी तालुका चिटणीस धीरज महाजन, विनोद हिंदुजा, भावडू राजपूत, समीर वैद्य यांच्यासह डॉ. सचिन बडगुजर, प्रा. डॉ. संजय भावसार, दिनेश गुजराथी, व शहरातील स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय महामार्गाचे जनरल मॅनेजर शिवाजी पवार तसेच टोल प्रोजेक्ट मॅनेजर लतीफ शेख यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संवाद साधत केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनांचे अधीन राहून निर्णय होईपर्यंत २० किलोमीटरच्या आतील स्थानिक रहिवाशी, डॉक्टर, वकील, व्यापारी यांना आधार कार्ड व आरसी बुकच्या आधारे टोल माफी करावी.अशा सूचना संबंधित टोल नाका व्यवस्थापक यांना मिळाल्याने त्यांनी पत्रकार परिषदेत २० किलोमीटर आतील स्थानिक रहिवाशांना यापुढे टोल लागणार नाही असे जाहीर केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम