सत्ताधारी आमदार नाराज ; मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप नाहीच !

बातमी शेअर करा...

राज्यात नुकतेच ठाकरे व शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत आहे तर सरकार लवकरच वर्षपूर्ती होत असून त्यानंतरही या सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यामुळे या सरकारमधील अनेक इच्छूक आमदार नाराज झालेत. त्यांची नाराजी वेळोवेळी दिसून येते. आता प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही या प्रकरणी जाहीर नाराजी व्यक्त करून सरकारवर निशाणा साधला आहे.

गतवर्षी 20 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली होती. त्यांच्यासोबत सेनेचे बहुतांश आमदार गेले होते. यामुळे अल्पमतात आलेले उद्धव ठाकरे सरकार कोसळले होते. या घटनेला मंगळवारी 1 वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराला वर्षभर लागेल असे आम्हाला वाटले नव्हते. या सरकारने काही चांगली कामे केली. त्यामुळे मी नाराज नाही. पण आता मंत्रिमंडळ विस्तार 2024 मध्येच होईल असे वाटत आहे. मी यापूर्वीही हा दावा केला आहे. या सरकारमध्ये ती क्षमता नाही, असे बच्चू कडू यासंबंधी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी गद्दार म्हणून हिणवऱ्यांना न्यायालयात खेचण्याचाही इशारा दिला. ते म्हणाले – आम्हाला गद्दार म्हणून हिणवणाऱ्यांविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल. याप्रकरणी मानहाणीचा दावा दाखल केला जाईल. आम्ही विकासासाठी त्यांच्यासोबत गेलो. उद्धव ठाकरे माणूस म्हणून खूप चांगले आहेत. पण मुख्यमंत्री म्हणून ते कमी पडले. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम