सध्या लुटारूंच राज्य सुरू ; ठाकरेंची फडणवीसांवर जोरदार टीका

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ जून २०२३ ।  ‘कोरोनाची लस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनवली. अन्यथा, आपण सर्व भीकेला लागलो असतो’, या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी अर्धवटच वाक्य ऐकले. ते अर्धवटराव आहेत, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिले होते. त्यावर पुन्हा उद्धव ठाकरेंनी पलटवार केला आहे. मी अर्धवटराव तर देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या आवडाबाई आहेत काय?, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी मुंबईला कुणी मायबाप राहिलेले नाही. सध्या लुटारूंच राज्य सुरू आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. तसेच, मुंबई पालिकेत सध्या प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहेत. त्याला वाचा फोडण्यासाठी 1 जुलैला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार, अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाची लस नरेंद्र मोदींनी बनवली, हे वाक्य देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत म्हटले, यावर माझाही विश्वास बसला नाही. जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तेव्हाही देवेंद्र फडणवीस असे बोलू शकतात, यावर माझा विश्वास बसत नव्हता. आता फडणवीस म्हणताहेत की, मी सभेत त्यांचे अर्धवटच वाक्य दाखवले. उद्धव ठाकरे अर्धवटराव आहेत. मात्र, मी जे काही वाक्य सभेत ऐकवले ते तर देवेंद्र फडणवीस बोलले आहेतच ना. स्वत:ची स्तुती करताना नरेंद्र मोदीदेखील असे कधी म्हणाले नसतील. मी सभेत दाखवलेली क्लिप चुकीची असेल देवेंद्र फडणवीसांचा तो व्हिडिओ कुणी मॉर्फ केला आहे का?, याचा शोध देवेंद्र फडणीसांनी घ्यावा. काही झाले तरी ते राज्याचे गृहमंत्री आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. अर्धवटराव हे भाऊ उपाध्याय यांच्या बोलक्या बाहुल्यातील एक पात्र आहे. असेच एक पात्र होते, आवडाबाई. मी अर्धवटराव आहे, तर फडणवीस काय दिल्लीच्या आवडाबाई आहेत?, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या पावसाप्रमाणे निवडणुका लांबत चालल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये निवडणुका घेण्याची हिंमत नाही. महापालिका, नगरपालिकेत कुणी लोकप्रतिनिधी नाही. अशा स्थितीत लोकांची सेवा करायची कशी? सध्या लुटारूंच राज्य सुरू आहे. लोकांचा पैसा उधळला जातोय. अशा वेळी कुणी जाब विचारायचा की नाही?

उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईला मायबाप कुणी मायबाप राहिले नाही. रस्ता, पाणी, वीज सर्व कामांत प्रचंड भ्रष्टाचार केला जात आहे. आम्ही सत्तेत असताना तुटीतील मुंबई महापालिका आम्ही नफ्यात आणली. मात्र, मुंबईकरांचा पैसा बिल्डरांच्या घशात घातला जात आहे. लोकांची कामेसुद्धा होताना दिसत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड खदखद आहे. याचा जाब विचारण्यासाठी १ जुलैला शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार. आदित्य ठाकरे या मोर्चाचे नेर्तृत्व करतील.

केंद्र सरकार समान नागरी कायदा आणण्याच्या तयारीत आहे. त्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, समान नागरी कायद्यात गोवंश हत्येवरही बंदी आणणार का?, हे हिंदूत्ववादी सरकारने स्पष्ट करावे. हे सरकार केवळ दंगली पेटवून त्यावर आपली राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. और दंगल वादी म्हणजे आणखी दंगल करणे, असा सरकारचा कारभार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम