शहरात एटीसीची कारवाई; एक जण ताब्यात

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ सप्टेंबर २०२२ । मागील आठवड्यात शहरात पीएफआयशी संबंधित असलेल्या एका संशयितास अटक झाली होती. आता आणखी एका व्यक्तीला सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतले.

BJP add

मिळालेल्या माहितीनुसार, याआधीच्या कारवाईत एटीएसने जालनाच्या रहमानगंज, वरुण अपार्टमेंट येथील रहिवासी असलेल्या अब्दुल हद्दी अब्दुल रऊफ मोमीन (वय ३१) यास २२ सप्टेंबरच्या सकाळीच मेहरूण परिसरातून ताब्यात घेतले होते. तपासात मोमीन हा या संघटनेचा खजिनदार होता, अशी माहिती समोर आली.

यावेळी पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अक्सानगर येथील रहिवासी उनैस उमर खय्याम पटेल (वय ३२) यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. उनैस हा बऱ्याच दिवसांपासून पीएफआयमध्ये शारीरिक शिक्षणाचा शिक्षक म्हणून कार्यरत होता.

दरम्यान, उनैससोबत असलेला शहादा येथील तरुण हा त्याचा विद्यार्थी असून चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले व उनैस पटेल विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. सदर कारवाई दहशतवाद विरोधी शाखा (एटीसी) चे प्रमुख चंद्रकांत पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या संयुक्त पथकाने केली आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम