आठवलेंच्या पार्टीने नागालँडमध्ये मारली बाजी !
दै. बातमीदार । २ मार्च २०२३ । राज्यात कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणूकांची चर्चा जोरदार सुरु आहे तर इशान्येकडील राज्यामधील निवडणूकांचा निकाल हाती येणे सुरू झाले आहे. या निवडणूकीत पहिल्यांदाच रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने बाजी मारली आहे.
#NagalandAssemblyElections2023 | Union Minister Ramdas Athawale's Republican Party of India (Athawale) wins two seats
NDPP wins 1 seat, leading on 25 seats, BJP won two seats and leading on 12 seats and Lok Janshakti Party (Ram Vilas) leading on 3 seats.
(file pic) pic.twitter.com/i62wKIXNGd
— ANI (@ANI) March 2, 2023
आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार नागालँडमध्ये विजयी झाले आहे. विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदाच पक्षाच्या दोन महिला उमेदवारांनी महाराष्ट्राच्या बाहेर विजयाचा गुलाल उधळला आहे. सुरु असलेल्या मतमोजणीत नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी सध्या आघाडीवर असून यादरम्यान महाराष्ट्राच्या बाहेर देखील रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. ही आठवले यांच्यासाठी ही मोठी गोष्ट असल्याचे बोलले जात आहे. या निकालांमुळे इतर राज्यातील निवडणूक निकालांवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता बोलली दात आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम