पालकानो लक्ष द्या : एज्युकेशन लोन घेणाऱ्यासाठी महत्वाची बातमी !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ मार्च २०२३ ।  सध्या दहावी बारावीचे पेपर संपण्यात आले आहे. तर येत्या दोन महिन्यात पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी पालकांनी आतापासून काळजी करीत आहे. कारण सध्या देशात झालेल्या महागाईचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही होत आहे. त्यामुळे मुलांच्या प्रवेशासाठी पालकनेहमी अशावेळी एज्युकेशन लोन हा असा एक पर्याय असतो. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या स्वप्नातील महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिक्षण घेऊ शकता.

सध्या सरकारी आणि खाजगी बँकांव्यतिरिक्त अनेक बिगर बँकिंग फायनान्स कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय बँका देखील परवडणाऱ्या दरात शैक्षणिक कर्ज देतात.
तुम्हालाही शिक्षणासाठी कर्ज घ्ययाचे असेल तर सर्वात स्वस्तात कर्ज देणाऱ्या बँकांकडून कर्ज घ्यावं. कारण कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला ते परत करावे लागेल आणि व्याजदर जास्त असल्यास त्याचा बोजा तुम्हाला सहन करावा लागेल. आज आपण कमी व्याजदराने कर्ज देणाऱ्या बँकांविषयी जाणून घेणार आहोत.

SBI : सध्या SBI सर्वात कमी व्याजदरात एज्युकेशन लोन देतेय. शैक्षणिक कर्जावरील बँकेचा वार्षिक व्याजदर 8.55 टक्क्यांपासून सुरू होतो. तुम्ही SBI कडून 50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकता. यामध्ये 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेण्यासाठी कोणतीही प्रोसेसिंग फीस नाही. दुसरीकडे, तुम्हाला 20 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी 10,000 रुपये प्रोसेसिंग फीस भरावी लागेल. SBI च्या 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जावर कोणतीही सिक्योरिटी नाही. परंतु कर्जाची रक्कम त्यापेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला सिक्योरिटी द्यावी लागेल.

PNB व्याजदर :पंजाब नॅशनल बँकेचा शैक्षणिक कर्जावरील व्याजदर 8.55 टक्क्यांपासून सुरू होतो. यामध्ये कर्जाच्या अमाउंटची लिमिट निश्चित केलेली नाही. तुम्हाला जितके पैसे लागतील तेवढे कर्ज तुम्हाला घेता येईल. तुम्हाला PNB मध्ये प्रोसेसिंग फी म्हणून 250 रुपयांसह GST भरावा लागेल. यामध्ये 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जावर कोणतीही सिक्योरिटी द्यावी लागणार नाही. परंतु कर्जाची रक्कम त्यापेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला सिक्योरिटी द्यावी लागेल.

BOB व्याजदर: सर्वात कमी व्याजावर शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँकांच्या यादीत बँक ऑफ बडोदाचाही समावेश आहे. शैक्षणिक कर्जावरील या बँकेचा व्याजदर 9.15 टक्क्यांपासून सुरू होतो. यामध्ये तुम्ही 1.25 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकता. 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तुम्हाला कोणतीही प्रोसेसिंग फीस किंवा सिक्योरिटी भरावी लागणार नाही. दुसरीकडे, कर्जाची रक्कम यापेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला 1% रक्कम फी म्हणून भरावी लागेल. तसेच प्रोसेसिंग फीसची कमाल रक्कम 10,000 रुपये आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम