मुंबईच्या अक्षरमंच वक्तृत्व स्पर्धेत जळगावच्या अनय डोहोळेला पारितोषिक

बातमी शेअर करा...

 

दै. बातमीदार | 03 ऑगस्ट 2022 | जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम शाळेतील इयत्ता 2 री चा विद्यार्थी अनय डोहोळे याने अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित अक्षरमंच राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले आहे.

लोकमान्य टिळक जयंती निमित्त अकादमीतर्फे वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात राज्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. वक्तृत्व स्पर्धेसाठी पूनम वाघमारे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. अकादमीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी खैरे यांनी या स्पर्धेचेआयोजन केले.

अनय हा अजय व अनघा डोहोळे यांचा मुलगा असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम