अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच मृत तरुण झाला जिवंत

बातमी शेअर करा...

दैनिक बातमीदार | 5 ऑगस्ट 2022 | कजगाव ता.भडगाव मृत्यू हा कधी कुठे केव्हा कसा येईल हे सांगणे अवघड आहे त्यामुळे जगात एकमेव मृत्यूला अंतिम सत्य मानले जाते. मात्र आलेला मृत्यू जर आल्या पावली मागे गेला तर?आश्चर्यच मग हो असेच काहीसे झाले आहे.
कजगाव येथुन जवळच असलेल्या बोदर्डे येथील रहिवासी प्रमोद सहादु पाटील यांचा एकुलता एक चोवीस वर्षीय मुलगा मोटार सायकल अपघात जखमी झाला होता त्याचावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते.

दि.४ रोजी तब्बेत अत्यंत खालावली श्वासोश्वास बंद पडला नी मृत झाल्याचे जाणवले नी बोदर्डे येथे अंतीमसंस्कार ची तयारी झाली. साऱ्या नातेवाईकांना फोन करत अंत्ययात्रेचा टाइम देण्यात आला नी सारे नातेवाईक सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ बोदर्डे येथे अंत्यसंस्कार साठी जमा झाले. आणि एक फोनने सर्वांनाच सुखद धक्का दिला त्याच्या जिवंत असण्याचा बोदर्डे गावातील तरुण स्वप्नील प्रमोद पाटील यांचा भडगाव वाक रस्त्यावरील जुना महिंदळे रस्त्यावर गेल्या आठ दहा दिवसांपूर्वी मोटार सायकलचा अपघातात झाला होता यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला ग्रामस्थांच्या व नातेवाईकांच्या मदतीने उपचारासाठी विविध ठिकाणी दाखल करण्यात आले व पुढे चांगल्या उपचारासाठी मोठ्या शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमी स्वप्नीलवर उपचार सुरू होते. प्रकृती खालावत असतांनाच श्वासोश्वास बंद पडल्याने तो मृत झाल्याचे जाणवले अचानक त्याच्या मृत्यूची बातमी गावावर धडकली आणि एकच रडबोंबल सुरू झाली सर्व नातेवाईक मित्रपरिवार ग्रामस्थ मोठ्या संख्येने स्वप्नीलला शेवटचा निरोप देण्यासाठी हजर झाली.

अत्यंविधीची वेळ ही ठरवण्यात आली आणि सर्व नातेवाईक दुपारी बारा वाजेला ठरल्या वेळेला स्वप्नीलच्या मृत शरीराचे अंतिम दर्शन घेण्यासाठी डोळ्यात पाणी आणून वाट पाहत होते मात्र तोच एक आनंदी बातमी गावावर धडकली आणि मृत स्वप्नीलला घराकडे घेऊन येताना रस्त्यावरच त्याचा श्वास पुन्हा चालू झाला असून तो जिवंत असल्याचा निरोप देण्यात आला यावर विश्वास ठेवणे कठीण असलेतरी हेच सत्य असून स्वप्नीलवर आता एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत त्याच्या मृत्यूच्या बातमीने दुःखी झालेल्या नातेवाईक ग्रामस्थांना या आनंदी बातमीने मोठा दिलासा मिळाला त्यामुळे देव तारी त्यास कोण मारी असेच शेवटी म्हणावे लागेल

आयुष्याची दोरी बळकट होती……
स्वप्नील हा एकुलता एक मुलगा दोन बहिणीचा लाडका भाऊ त्याचा अपघात होतो उपचार सुरू असतात मृत झाल्याचं कळत अंतीमसंस्कार ची तयारी होते सारे नातेवाईक अंत्यसंस्कार साठी जमतात भावपुर्ण श्रद्धांजली चं बॅनर देखील लागतात नी गावात वार्ता येते स्वप्नील जिवंत आहे दुखद अश्रू आनंद अश्रू त वाहू लागतात नी सारेच त्याच्या भेटीसाठी रवाना होतात स्वप्नील ची आयुष्याची दोरीचं बळकट होती असच काहि म्हणावे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम