बागेश्वर धाम सरकार येणार अडचणीत ? पुन्हा केला नवा दावा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ एप्रिल २०२३ ।  देशात आपल्या चमत्कारातून अनेकदा चर्चेत आलेले व नेहमीच बेताल वक्तव्य करणारे बागेश्वर धमाचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी आजपर्यंत अनेक विधाने केली आहेत ज्यामुळे देशात वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना कायद्याच्या कचाट्यातदेखील अडकावे लागले आहे. दरम्यान, या सगळ्यात आता पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री यांनी एक विधान केले आहे ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एका कार्यक्रमात शास्त्री यांनी शिर्डीचे साईबाबा यांच्याविषयी ‘गीदड की खाल ओढकर कोई शेर नही बन सकता” (गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही.) असे म्हटले. तसेच यावेळी शास्त्री यांनी साई बाबांना ईश्वर मानन्यास नकार दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे आता ते नव्या वादात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धीरेंद्र शास्त्री यांचे भगवत गीतेचे जबलपूरमध्ये पारायण सुरु होते. शनिवारी या पारायणाचा शेवटच्या दिवशी शास्त्री आणि जमलेल्या लोकांमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी एका व्यक्तीने शास्त्री यांना शिर्डीच्या साई बाबांबद्दल सवाल केला. त्यावेळी शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केले. साईबाबांविषयी बोलताना ,”आमच्या धर्माचे शंकराचार्य यांनी साई बाबांना ईश्वराचं स्थान दिलेलं नाही. शंकराचार्य यांचं मत मानणं अनिवार्य आहे. त्यांच्या मताचं पालन करणं प्रत्येक सनातनी व्यक्तीचं कर्तव्य आहे. कारण ते धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणतेही संत ते आपल्या धर्माचे असो अथवा दुसऱ्या त्यांना ईश्वराचं स्थान देता येणार आहे.”असे म्हणाले.

पण पुढे बोलताना शास्त्री यांनी, कोणतेही संत ते तुलसीदास असतील, सूरदास असतील किंवा इतर कोणतेही ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरूष आहेत, परंतु ते ईश्वर नाहीत. मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. परंतु मी हे बोलणंदेखील गरजेचे आहे की, गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही. याला लोक वादग्रस्त वक्तव्य म्हणतील पण हे बोलणं खूप गरजें आहे. आपण साईबाबांना संत म्हणू शकतो, फकीर म्हणू शकतो, पण ईश्वर नाही.असे त्यांनी म्हटले. दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे सध्या नवा वाद निर्माण झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम