बातमीदार | २० ऑगस्ट २०२३ | राज्यातील मोठ्या शहरात नेहमीच वेगवेळ्या स्टँडअप कॉमेडियनचा कार्यक्रम होत असतो असाच एका कार्यक्रम छत्रपती संभाजी नगरात सुरु असतांना बजरंग दल कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला आहे. पण काही वेळाने हा शो सुरु करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजी नगरात शनिवारी वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी याचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीने शो पुन्हा सुरू करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी ५ ते ६ जणांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. तापडिया नाट्यमंदिरात १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी याचा शो आयोजित करण्यात आला होता. फारुखीवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी देशभरात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्याचे अनेक शो रद्द करण्यात आले होते. त्याच्या शोसाठी ऑनलाइन तिकीट विक्री झाली होती. शनिवारी सायंकाळी त्याचा शाे सुरू झाला. ही माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते तापडिया नाट्यमंदिरात पोहोचले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर क्रांती चौक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परंतु बजरंग दलाचे कार्यकर्ते ऐकण्यास तयार नसल्याने पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन कार्यकर्त्यांची समजूत घालत पुन्हा शो सुरू करण्यास परवानगी दिली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम