श्री बालाजी महाराजांचा ब्रह्मोत्सव शांततेत पार पाडा – माजी खासदार ए टी पाटील
सर्व सामान्यांना मिळणार बालाजी महाराज यांच्या आरतीचा मान
पारोळा
येथील तीनशे वर्षाहून अधिक ऐतिहासिक असलेले श्री बालाजी महाराज मंदिर यांचा सालाबादप्रमाणे ब्रह्मोत्सव दिनांक ३ ऑक्टोबर २४पासून सुरू होणार आहे तर रथोत्सव दि. १४ ऑक्टोंबर रोजी असणार आहे. असे पत्रकार परिषद मधे कळविण्यात आले.
पत्रकार परिषदेमध्ये माजी खासदार ए टी पाटील यांनी ब्रह्मोत्सवाचा सविस्तर कार्यक्रम व मार्ग सांगण्यात आला. ब्रह्मोत्सवानिमित्त तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे नगर परिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण पाडा पोलीस निरीक्षक सुनील पवार व एम एस ई बी चे सहारे हे उपस्थित होते. ब्रह्मोत्सवात येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जायचे व त्याच्या उपाययोजना आज रोजी करण्यात आल्या. पारोळा पोलीस निरीक्षक यांनी हजर असलेल्या मंडळांना आपला उत्सव निर्व्यसनी व कोणत्याही गालबोट न लागता पार पडावा या सूचना देण्यात आल्या तसेच नगरपरिषदेला वाहनाच्या व रथोत्सवाच्या मार्गांकरिता खराब असलेले रस्ते व रथ उत्सवानिमित्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याकरिता ए टी पाटील यांनी सूचना दिल्या.
श्री बालाजींच्या आरतीच्या मानाची संधी सर्वसामान्य भाविकांना मिळणार…
श्री बालाजी महाराज यांची रोजच होणारी मानाची आरती आता सर्वसामान्य भाविकांना देखील करता येणार आहे. त्या करीता विश्वस्त मंडळ या वर्षा पासून पंढरपूर येथील मानाची आरती ज्या पद्धतीने भाविक निवडून करू दिली जाते, या धरतीवरच येथे रोज एक भविकास आरतीचा मान दिला जाणार आहे.
त्या करीता कूपन प्रवेशिका भरून मंदिर व्यवस्थापनाकडे द्यावयाचे आहे.
ही संकल्पना श्री बालाजी भक्त राहूल निकम यांनी विश्वस्तानपुढे मांडली होती. संकल्पना सर्वसामान्यांसाठी असल्याने ती तात्काळ स्वीकारण्यात आली
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी लवकरच कुपण उपलब्ध करण्यात येतील. असे मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी यांनी सांगितले आहे.
कल्याण कट्टा (केस अर्पण) मंदिराच्या आवारातच होणार
यावेळी नाभिक समाज यांच्याकडून कल्याण कट्टाची मंदिर आवारात मागणी करण्यात आली होती तरी ती सर्वानुमते मंजूर करून मंदिर आवार होईल हे विश्वस्तांनी सांगितले.
या बैठकीत माजी खासदार ए टी पाटील, तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे नफा मुख्याधिकारी किशोर चव्हाण आवळा पोलीस निरीक्षक सुनील पवार, वीज वितरण कंपनीकडून सहारे, बालाजी महाराज संस्थांचे विश्वस्त भैय्या शिंपी, अनिल गुजराथी, प्रकाश शिंपी, दिनेश गुजराथी, रावसाहेब भोसले, मंगेश तांबे, दत्ताजी महाजन व हमाल मंडळी, चोपदार लेझिम मंडळ व सर्व बालाजी भक्त उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम