इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असो. च्या जळगाव विभाग चेअरमनपदी बाबुभाई मेहेंदी तर सचिवपदी अनिकेत पवार

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | २७ सप्टेंबर २०२२ | जळगाव येथील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य, जळगाव विभागाची २३ सप्टेंबर २०२२ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. नवनिर्वाचित चेअरमनपदी बाबुभाई मेहेंदी यांची बिनविरोध तर सचिवपदी अनिकेत पवार आणि संचालक पदी आनंद विरघट, अमित टोके, राजेंद्र सपकाळ, कुणाल पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी तसेच महावितरणचे ठेकेदार, अधिकारी, सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी आपले मत व्यक्त करतांना बाबुभाई मेहेंदी म्हटले की, आपल्या जळगाव विभाग संघटनेस नुकतेच ११ वर्ष यशस्वीरित्या पुर्ण झालेली असुन आपण १२ व्या वर्षात पदार्पण करीत आहोत.

गेल्या २ ते ३ वर्षात कोरोना सारखा महामारीचा अनुभव माझ्या सोबत आपणही अनुभवला आहेच. गेल्या तीन वर्षात संघटनेच्या सचिवपदी काम करीत असतांना अनेक अडचणींना सामोरे जात असतांना आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्यासोबतच आपल्या मिळालेल्या सहकार्यामुळे मी माझा सचिवपदाचा कार्यकाळ पुर्ण करु शकलो. आज आपली संघटना विविध शासकीय तसेच निमशासकीय क्षेत्रामध्ये काम करीत असतांना आपल्या सहकारी बंधुंना अडचणी येत असतात.

अशावेळी जळगाव सर्कल, महावितरण किंवा इतर खात्यांमार्फत काही अडचणी आल्यास संघटना योग्य ते सहकार्य करुन आपल्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंच्या सर्व अडचणी दुर करेल, याची मी ग्वाही देतो. तसेच एकजुटीने आपली संघटना अधिक मजबुत करण्यासाठी नवीन सभासद नोंदणी करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती करतो.
इलेक्ट्रिकल क्षेत्रात आज वेगवेगळे बदल होत आहेत, या बदलांचा स्वीकार करुन काम केले पाहिजे. तेव्हाच आपली प्रगती होऊ शकते. संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सुटत असल्याने संघटनेला फार महत्व आहे. संघटनेच्या माध्यमातून सभासदांच्या उन्नतीचे काम होत आहे. यापुढील काळात असेच काम करुन सभासदांचे प्रश्न सोडविले जावेत, अशी अपेक्षा नवनिर्वाचित चेअरमन बाबुभाई मेहेंदी यांनी व्यक्त केली.

मध्यभागी नवनिर्वाचित चेअरमनपदी बाबुभाई मेहेंदी तर सचिवपदी अनिकेत पवार आणि संचालक पदी आनंद विरघट, अमित टोके, राजेंद्र सपकाळ, कुणाल पाटील आदी…

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम