शहरात भर रात्री अग्नितांडव; लाखोंचे साहित्य जळून खाक

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ सप्टेंबर २०२२ । शहरात एमआयडीसी येथील व्ही सेक्टरमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. लाखों रुपयांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधील “हिरा रोटो पॉलिमर्स” या कंपनीत ही घटना घडली आहे. कंपनीत असलेल्या १० हजार लीटर क्षमतेच्या इलेक्ट्रिक मशीन पॅनलमध्ये रविवार (दि.२५) रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. या आगीच्या घटनेत १० हजार लीटर क्षमतेचे इलेक्ट्रिक मशीन पॅनल, १ हजार लीटर क्षमतेचा डुअल टँकर, दोन पी.पी. कस्टमाईज्ड टँक, एक स्पाइलर इंट्री, प्लॅस्टिक टाकीचे १५ झाकण, डस्टबिन, ५०० लीटरची पाण्याची टाकी, असा एकूण ३ लाख २० हजार ४७० रुपयांचा ऐवज जळून खाक झाला.

दरम्यान, याप्रकरणी कंपनीचे मालक भूषण खडके (रा. सदोबा नगर) यांच्या खबरीवरून सदरील आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पो.हे.कॉ. विजय पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम