कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवून यश संपादन करा : राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे

बातमी शेअर करा...

भडगांव:-प्रतिनिधी

पैसा कमविण्या पुरता शिक्षण न घेता, आपला समाज सुशिक्षित करण्यासाठी या शिक्षणचा उपयोग झाला पाहिजे. दहावी, बारावी हे शैक्षणिक वर्ष आपल्या जीवनाला कलाटणी देणारे वर्ष आहे. या परीक्षेत मिळालेले गुणा मुळे हुरळून न जाता कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवून यश संपादन करा, तसेच मोबाईल पासुन सुरक्षित अंतर ठेवुन रहा, मोबाईल हा जितका चांगला आहे. त्यापेक्षा अधिक पटीने घातक आहे. त्याचा वापर योग्य वेळी योग्य ठीकाणी करा. असे मार्गदर्शन चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यानी केले.गुणवंत पाल्य सन्मान प्रसंगी ते बोलत होते.

भडगांव तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघ वतीने तालुक्यातील गुणवंत पाल्याचा गुणगौरव सोहळा पंचायत समिती छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी व्यासपीठावर पांडुरंग बाविस्कर, गटविकास अधिकारी रमेश ओ. वाघ, भडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. समाधान वाघ, डाॅ. नीळकंठ पाटील, योजना पाटील तालुकाध्यक्ष रवि अहिरे, महिला तालुकाध्यक्ष सुरेखा वाघ, संगिता अहिरे, विमलबाई बोरसे, सरस्वतीबाई अहिरे आदी उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील सर्व घटकातील दहावी, बारावीतील उत्तीर्ण गुणवंत पाल्यसह ग्रामसेवक भिला बोरसे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल, माधवराव वाघ, एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल विवेक बि-हाडे, सह अन्य क्षेत्रात नियुक्ती, निवड, बढती, पदोन्नती झालेले समाज बांधव यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवुन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रविण महाजन यानी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चर्मकार महासंघ तालुकाध्यक्ष रवि अहिरे, तालुका उपाध्यक्ष मधुकर वाघ, युवाध्यक्ष सुधीर अहिरे, तालुका संघटक आबासाहेब बाविस्कर, शहर संघटक संजय शेवाळे सह अन्य समाज बांधव यांनी परीश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम