मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यात एका साधूला मारहाण ; खुनाचा गुन्हा दाखल

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ ऑक्टोबर २०२२ ।  राज्यात काही दिवसांपूर्वी मुलं चोरणाऱ्या टोळीच्या संशयावरून विविध जिल्ह्यात नागरिकांनी अनोळखी लोकांना मारहाण केली होती, त्यानंतर हे कृत्य थांबविण्यासाठी राज्यातील पोलीस प्रशासनाने आवाहन केले होते. सांगलीमध्ये साधूंना मारहाण झाल्याची घटना घडली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात एका साधूला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका जणावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील श्रीनगर पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. मंदिरातील एका साधूवर एका इसमाने प्राणघातक हल्ला केला. संबंधित साधू आणि हल्लेखोर हे दोघेही एकाच परिसरात राहणारे आहे. दारूच्या नशेत या इसमाने साधूवर चाकूने हल्ला केला. दारुच्या नशेत ही मारहाण झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ज्याने मारहाण केली तो दारु प्यायलेला होता. या घटनेनंतर साधूने श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोरावर खुनाचा प्रयत्न गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. दरम्यान, महिन्याभरापूर्वीच सांगलीमध्ये पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या चार साधूंना सांगली जिल्ह्यातील लवंगा येथे ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली होती. मुल चोरणारी टोळी असल्याची संशयावरून ही मारहाण करण्यात आली होती.

चार चाकी गाडीतून ओढून रस्त्यावर लाथाबुक्याने बेल्टने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून याप्रकरणी 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर आता पर्यंत 8जणांना ताब्यात घेऊन 7 लोकांना अटक करण्यात आली आहे. मारहाण झालेले चार ही साधू उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मथुरा पंचदर्शन जुना आखाड्यातील आहेत. ते कायम विविध धार्मिक स्थळी भेट देतात. नेहमीप्रमाणे त्यांनी कर्नाटकातील काही धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर मंगळवारी वारकरी संप्रदायातील मुख्य ठिकाण पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात होते. त्यावेळी ही घटना घडली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम