हि मशाल राज्यातून तुम्हाला नेस्तनाभूत करेल : दानवे

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ ऑक्टोबर २०२२ ।  धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल चढविला. या सरकारमधील मंत्र्यांनी शेतकऱ्यांशी कोणतंही देणंघेणं नसल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला. शिंदे सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा माज आला असून त्यांना शेतकऱ्यांनी काहीही देणं-घेणं नाही, असं ते म्हणाले.

ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावरुनही अंबादास दानवे यांनी भाजपला सुनावलं. मशाल ही मजबूत हातात असून तुम्ही तुमचं कमळ सांभाळा, असा सल्ला त्यांनी चंद्रशेखन बावनकुळे यांना दिला. अंबादास दानवे म्हणाले, की मशाल ही मजबूत हातात आहे. तुम्ही तुमचं कमळ सांभाळा. हीच शिवसेना आणि मशाल तुम्हाला महाराष्ट्रात नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नसल्याचा गंभीर इशाराही विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला आहे. विरोधी पक्षनेते दानवे यांनी धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम