दिल्लीच्या कृपेने मुख्यमंत्री झाले ; ठाकरेंचा शिंदेंवर निशाना !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ नोव्हेबर २०२२ । “महाराष्ट्रात ईडी,खोके, मिंधे सरकार आहे. या सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत का, ते कळतच नाही. त्यांना विचारलं तर ते सांगितील, मी पंतप्रधानांना सांगितलेलं आहे, ते म्हणाले, त्यांनी चाळीस गावे मागितले ते द्या, आपण पाकव्याप्त काशमीर जिंकल्यानंतर शंभर गावं देऊ”, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लगावला.
“मुख्यमंत्री भाजपच्या वरिष्ठांच्या आज्ञेशिवाय चालत नाही. त्यांना खुर्चीला चिपकून बसायचं आहे. ते लाचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री आहोत, असं त्यांना वाटतंच नाही”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले ते दिल्लीवाल्यांच्या कृपेने, ते दिल्लीवाल्यांच्या विरोधात काय बोलणार? ते खुर्ची सोडू शकतात का? त्यांच्यात हिंमत आहे का तितकी? महाराष्ट्राचा अपमान सहन करायचा, हे बाळासाहेब ठाकरेंचं हिदुत्व आहे?”, असे सवाल उद्धव ठाकरेंनी केले.

“आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. साधारणत: एक प्रघात आहे, ज्यांचं सरकार केंद्रात आहे, त्यांचीच माणसं किंवा त्यांच्या विचारसरणीचीच माणसं ही देशातील सगळ्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून जातात. या माणसांची कुवत काय असते? पात्रता काय असते?”, असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले. “एक शब्द वापरतो, कुणी गैरसमज करु नये, ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? असा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे. राज्यपाल नियुक्तीचे निकष ठरवायला पाहिजेत. राज्यपाल हे आपल्या महामहीम राष्ट्रपतींचे दूत असतात”, असं ठाकरे म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम