मराठी असल्याने ऑफिस मिळणार नाही ; अजित पवारांनी घेतली दखल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २८ सप्टेंबर २०२३

राज्यात एका महिलेचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. मराठी महिलेला मुलुंडमधील गुजराती सोसायटीमध्ये ऑफिस नाकारल्याची चिड आणणारी घटना बुधवारी उघडकीस आली आहे. महाराष्ट्रीयन लोकांना सोसायटीत प्रवेश नसल्याची मुजोरीची भाषा सोसायटीच्या सेक्रेटरीने केली. यावेळी महिलेसोबत अरेरावी देखील करण्यात आली. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तृप्ती देवरुखकर असं या महिलेचे नाव असून तिने घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या महिलेची अडचण समजून याबाबत सोसायटीच्या सेक्रेटरीला मनसे स्टाईलमध्ये जाब विचारला. मनसेच्या दणक्यानंतर अरेरावी करणाऱ्या व्यक्तीला माफी मागायला लागली. या घटेनेची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य महिला आयोगाने देखील घेतली आहे.

तृप्ती देवरुखकर या आपल्या पतीसह मुंबईतील मुलुंड पश्चिममध्ये ऑफिस भाड्याने घेण्यासाठी गेल्या होत्या. तेथे एका सोसायटीमध्ये त्या ऑफिस पाहण्यासाठी गेल्या असता तिथे त्या मराठी असल्याने त्यांना ऑफिस मिळणार नाही असं त्या सोसायटीच्या सेक्रेटरीने सांगितलं. मात्र याबाबत तृप्ती यांना जाब विचारला. यावेळी त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा वापरण्यात आली. आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत तृप्ती यांना सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. यावेळी त्यांना मराठी माणसांच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्याला सर्वच राजकीय पक्षांना फटकारलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम