दोन उपमुख्यमंत्री पवार व फडणवीसांमध्ये बंदद्वार चर्चा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २८ सप्टेंबर २०२३

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील राजकारण अनेक मुद्यावरून चर्चेत येत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सागर बंगल्यावर जाऊन दीड तास बंदद्वार चर्चा केली. पवार यांनी फडणवीस यांच्याकडील गणपतीचे आधी दर्शन घेतले आणि नंतर दीर्घ चर्चा केली. यावेळी हे दोघेच उपस्थित होते. बैठकीचा तपशील अधिकृतरीत्या कळू शकला नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मध्यंतरी मुंबईत दिवसभराच्या भेटीसाठी आले असता अजित पवार पुण्यात विविध कार्यक्रमांना हजर राहिले होते. अपरिहार्य कारणांमुळे आपण मुंबईत राहू शकलो नाही पण त्याची पूर्वकल्पना आपण शाह यांचे कार्यालय तसेच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयास दिलेली होती असे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यातच, अर्थ खाते आपल्याकडे राहील की नाही, सांगता येत नाही असे विधान अजित पवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस अजित पवार यांच्यातील आजची दीड तासांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम