उशिरा का होईना..पण आनंद ; शरद पवार

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ ऑक्टोबर २०२२ ।   राज्याचे लक्ष लागून असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपने माघार घेतल्याने सर्वच विरोधकांनी भाजपवर स्तुतिसुमने केली आहेत. भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय उशिरा का होईना घेतला. याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

तसेच, .एमसीए निवडणुकीचा अंधेरी पोटनिवडणुकीशी काहीही संबंध नाही. एमसीए निवडणूक ही अराजकीय आहे. दोन्ही निवडणुकांचा संबंध लावणे चुकीचे असल्याचेही शरद पवार म्हणाले. भाजपच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, भाजपने माघार घेतल्यानंतर अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होईल, असे म्हणणे चुकीचे आहे. अजूनही सहा ते सात अपक्ष या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार आहे. यातील एकजण जरी निवडणुकीस उभा राहिला तर ही निवडणूक लढवावीच लागेल.
शरद पवार म्हणाले, अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, अशी मागणी मी भाजपला केली नव्हती. तर केवळ सूचना केली होती. याबाबत उशिरा का होईना भाजपने निर्णय घेतला याचा आंनद आहे. याचे श्रेय मनसेप्रमुख राज ठाकरेंना जाते याला माजी काहीही हरकत नाही. आता उर्वरित अपक्षांनी माघार घेतल्यास चांगलेच होईल.

शरद पवार म्हणाले, पराभवाच्या भीतीने भाजपने माघार घेतली का? भाजपने उशीरा निर्णय घेतला, अशी टीका करण्यात आता काहीही अर्थ नाही. भाजपने माघार घेतली हेच महत्त्वाचे आहे. एकदा भाजपने माघार घेतल्यानंतर त्यांच्या भूमिकेवर शंका घेण्याने काहीही होणार नाही. रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांची पत्नीची बिनविरोध निवड व्हावी, अशी आमची इच्छा होती. शरद पवार म्हणाले, तसेही ऋतुजा लटके केवळ एक, दीड वर्षासाठीच आमदार राहणार आहे. पाच किंवा चार वर्षांसाठी निवडणूक होणार असती तर ही वेगळी बाब होती. एवढ्या छोट्या कालावधीसाठी ऋतुजा लटकेंनी निवडणूक लढवावी लागू नये, अशी आमची इच्छा होती. आता त्यांचा विजय होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे भाजपच्या निर्णयावर आता टीका करू इच्छित नाही. असे निर्णय पटकन होत नाही. त्यासाठी काही ना काही ग्राऊंड वर्क करावे लागते. त्याप्रमाणे भाजपने निर्णय घेतला असेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम