ठाकरे यांचे फडणवीस यांना पुन्हा पत्र.. व्हायरल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ ऑक्टोबर २०२२ ।   दोन दिवसा आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले होते. त्यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा आज भाजपने केली. त्याबद्दल राज ठाकरे यांनी फडणवीसांचे आभार मानलेले एक पत्र आज पुन्हा पाठविले आहे. मागील पत्राच्या त्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल राज ठाकरे यांनी हे आभार पत्र लिहिले आहे.

वाचा काय आहे पत्र ?
राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणीस यांना लिहिलेल्या पत्रातील मजकूर असा आहे. ते म्हणतात की, प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र! काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतशः आभार.

राज ठाकरे पत्रात पुढे म्हणतात की, चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी, असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिल्या ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार…!

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम