चिमुकलीच्या हत्येच्या निषेधार्थ भडगाव शहर तथा तालुका व्यापारी असोसिएशने स्वयंफुर्तीने पुकारला बंद
भडगाव/प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील गोंडगाव या गावी आठ वर्षे चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करून कुट्टीच्या ढिगाराखाली दाबून निर्दयीपणे हत्या करणाऱ्या नराधमास कोठारात कठोर कारवाई करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून या खटल्यासाठी ऍडव्होकेट उज्वल निकम यांचे नियुक्ती करून आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी यासाठी भडगाव शहर तसेच तालुक्यातून सर्व व्यापारी, मेडीकल असोसिएशन, किराणा असोसिएश, हातमजूर, हॉटेल असोसिएशन, सलून असोसिएशन, पान टपरी व्यावसायिक, सोनार असोसिएशन, आटोमोबाईल असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक व हार्डवेअर असोशियन, कापड असोशियन, फोटोग्राफर असोशियन व सर्व ग्राहक सेवा संघ अश्या सर्व व्यापारी तसेच दुकानदार युनियन यांनी स्वयंपूर्णतेने आपापले व्यवसाय तसेच दुकाने बंद ठेवून या निंदनीय घटनेचा जाहीर निषेध केला व भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील,यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी व्यापारी संघटना पदाधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम