ग्रामीण भागात खरी बुद्धिमत्ता, विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाची नितांत आवश्यकता : आमदार किशोर पाटील

बाल वैज्ञानिकांना प्रोत्साहन देणारे भडगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वीरित्या संपन्न

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

ग्रामीण भागात खरी बुद्धिमत्ता असते. पण ती ओळखण्यासाठी अशा कार्यक्रमाची नितांत आवश्यकता आहे. विज्ञान ची आवड ही देशाच्या विकासाला गती देण्यासाठी व वैज्ञानिक प्रगती ला दिशा देणारे ठरू शकते. बाल वयात वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जायला हवा त्या दृष्टीने विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम झाले पाहिजे विज्ञानाची आवड ही निर्माण झाली पाहिजे. असे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमात आमदार किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत मत व्यक्त केले.

शिक्षण विभाग भडगाव व आदर्श कन्या महाविद्यालय याच्या वतीने ‌तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन हे आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच याप्रसंगी आदर्श कन्या महाविद्यालय अध्यक्ष एकनाथ महाजन, गटशिक्षणाधिकारी गणेश पाटील, सुधीर चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रदर्शनात इयत्ता सहावी ते आठवी या गटातून 41 उपकरणे विद्यार्थ्यांनी आणली होती तर माध्यमिक गटातून 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या संशोधक वृत्तीतून विविध उपकरणे मांडली नाविन्यपूर्ण उपकरनाची मान्यवरांनी पाहणी करताना माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यावेळी आदर्श कन्या महाविद्यालय अध्यक्ष एकनाथ महाजन, सचिव दीपक महाजन, तालुका समन्वय समिती अध्यक्ष युवराज आबा पाटील, माजी नगराध्यक्ष शशी येवले, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील (भुरा आप्पा), गटशिक्षणाधिकारी गणेश पाटील, मुख्याध्यापक संघाचे दीपक बोरसे, एस टी पाटील, आर डी निकम,वैशाली पाटील, रवींद्र महाजन, मीनाताई महाजन, सहसचिव विनोद महाजन, नगरसेवक संतोष महाजन केंद्रप्रमुख जिजाबराव पाटील, रावसाहेब पाटील, लोकमत पत्रकार अशोक परदेशी, विज्ञान मंडळाचे तालुका समन्वयक सागर भोसले, सुधीर चव्हाण, पर्यवेक्षक शामकांत पंडितराव बोरसे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीसह आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.ओ.महाजन सर, प्रास्ताविक मुख्यध्यापक सुरेश रोकडे केले तर आभार रत्नमाला पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम