भडगाव पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांची सायबर क्राईम जळगाव येथे बदली तर नवीन पोलिस निरीक्षक पदी राजेंद्र पाटील यांनी घेतला पदभार

बातमी शेअर करा...

भडगाव-प्रतिनिधी

     भडगाव पोलिस निरीक्षक अशोक रावजी उतेकर यांची जळगाव येथे सायबर क्राइम ब्रँच येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी बुलढाणा येथून पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रल्हाद पाटील यांची भडगाव पोलिस स्टेशन ला नेमणूक झाली असून यावेळी पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांची जळगाव स्थानिक गुन्हे शाखा याठिकाणी बदली झाल्याने त्यांचा सुद्धा निरोप समारंभ यावेळी करण्यात आला.

    यावेळी भडगाव पोलिस स्टेशनला आज सायंकाळी निरोप समारंभ व सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार मुकेश हिवाळे हे होते. गटविकास अधिकारी -आर. ओ. वाघ, मुख्याधिकारी- रवींद्र लांडे, वैद्यकिय अधिकारी-डॉ. राहुल नेतकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर आदी कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी अशोक उतेकर व पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे यांना निरोप देण्यात आला. यावेळी भडगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष- सागर शिवदास महाजन, पत्रकार अशोक परदेशी, पत्रकार नरेंद्र पाटील, राजू शेख, राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे सुरेंद्र मोरे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे, अनिल पवार, अँड- प्रकाश तिवारी, आर. के. पवार, साहेबराव महाजन, गोपनीय विभागाचे विलास पाटील, स्वप्नील चव्हाण, पो.हे.कॉ. नितीन रावते, प्रवीण परदेशी, किरण पाटील, अल्पेष कुमावत, जिजबराव पवार, ज्ञानेश्वर महाजन, मनोज महाजन, विजय जाधव, पांडुरंग सोनवणे, हिरालाल पाटील, निलेश ब्राम्हणकर, प्रकाश गढरी आदीसह गावातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश रोकडे सर यांनी तर आभार गोपनीय विभागाचे स्वप्नील चव्हाण यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम