प्रा. डॉ. अतुल देशमुख जळगाव जिल्हा महाविद्यालयीन पतसंस्थेच्या संचालकपदी विजयी

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

जळगाव जिल्हा महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल मधुकरराव देशमुख हे संचालकपदी भरघोस मतांनी निवडून आले. त्यांच्यासोबतच प्रगती पॅनलचे सर्वच्या सर्व 11 उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले. सर्वसाधारण प्रवर्गातून डॉ. अनिल गुलाबराव पाटील (रावेर), डॉ. किशोर गोविंद कोल्हे (ऐनपूर), डॉ. राजेंद्र शामराव पाटील (पारोळा), डॉ. किशोर शिवलाल पाटील (अमळनेर), डॉ. शैलेशकुमार आबासाहेब वाघ (चोपडा) हे निवडून आले आहेत. महिला प्रवर्गामधून डॉ. सुनीता प्रमोद चौधरी (जळगाव) व प्रा. स्वाती वसंतराव शेलार (एरंडोल) यांनी बाजी मारली आहे तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामधून डॉ. संजीव बळीराम साळवे (मुक्ताईनगर) यांची निवड झाली आहे. एकूण 11 जागांपैकी इतर मागासवर्ग प्रवर्गामधून प्रा. सुरेश रमेश अत्तरदे (धरणगाव) व भटके विमुक्त जाती जमाती प्रवर्गामधून डॉ. विजय एकनाथ सोनजे (फैजपूर) हे दोन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. प्रगती पॅनलने प्रा.डॉ. मधुकर खराटे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली. या विजयात प्राचार्य प्रा. विजय पवार, प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख, प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, प्राचार्य डॉ. एस.आर. जाधव, प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.
डॉ. अतुल देशमुख यांच्या विजयाबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही.टी. जोशी, ज्येष्ठ संचालक नानासाहेब देशमुख, विनय जकातदार, विजय देशपांडे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम