भुजबळ हे भाजपची स्क्रिप्ट वाचतात ; आ.रोहित पवारांची टीका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ नोव्हेबर २०२३

राज्यात मराठा व ओबीसी समाज आरक्षणाच्या मागणीवर जोर वाढत असतांना आता शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून बीड जिल्हा दौऱ्यावर असतांना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ आणि नामदेव जाधव यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

आ.पवार म्हणाले कि, छगन भुजबळ हे भाजपची स्क्रिप्ट वाचतात आणि त्यांना नामदेव जाधव हे कॉपी करतात आणि या दोघांना पुढे करणारे देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नामदेव जाधव स्वतःला माता जिजाऊंचे वंशज समजतात. त्याच कारण असं सांगतात, की मी माझ्या पुस्तकात असं लिहिलंय, की मी वंशज आहे. आता जी व्यक्ती माता जिजाऊंचं नाव चुकीच्या पद्धतीने घेते आणि वंशज आहे असं सांगत आहे, अशांचा मी निषेध करतो. त्यांचं नाव घेऊन ते पुस्तक विकतात, व्यवसाय करतात, त्यांना आमदार व्हायचं आहे. अशा खालच्या विचाराची माणसं काहीही बोलतील आणि त्यावर आम्ही प्रतिक्रिया देणं योग्य नसल्यांच ते म्हणाले.

ज्यांनी शाई टाकली त्या कृत्याचं आम्ही समर्थन करत नाहीत. शरद पवारांच नाव बदनाम करण्याचा प्रयत्न जाधवांकडून केला जात असताना काही कार्यकर्ते गप्प बसत नाहीत. मात्र त्या कार्यकर्त्यांना काही अडचण आली तर आम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू. असं म्हणत रोहित पवार यांनी नामदेव जाधव यांना काळं फासणाऱ्या कार्यकर्त्यांची बाजू मांडली. नामदेवराव जाधव हे भुजबळांची भाषा बोलतात. त्यांची कॉपी करतात आणि भुजबळ साहेब जे काही बोलतात ते भाजपची स्क्रिप्ट वाचतात आणि या दोन्ही नेत्यांना कोणी पुढे केले असेल ? याचा अभ्यास केला तर नाव पुढे येते, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं, असा आरोप त्यांनी केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम