अंतिम सामना पाहण्यासाठी किंग खान मैदानात दाखल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ नोव्हेबर २०२३

प्रत्येक भारतीय आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा फायनलचा सामना पाहण्याचा आनंद घेत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असून या सामन्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. अशातच बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी देखील आपल्या उपस्थितीनं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध न्युझीलंडच्या सेमी फायनलला मोठ्या प्रमाणात बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती. त्यात जॉन अब्राहम, माधुरी दीक्षित, शाहिद कपूर, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, सुपरस्टार रजनीकांत यांनी चाहत्यांची पसंती मिळवली होती. त्यानंतर आजच्या अंतिम सामन्याला देखील प्रसिद्ध सेलिब्रेटींनी हजेरी लावत टीम इंडियाला सपोर्ट केले आहे.

 

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि त्याचा मुलगा आर्यन खान हे देखील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्याला उपस्थित असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यापूर्वी किंग खान शाहरुख हा फायनलला उपस्थित राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता शाहरुख, आर्यन खान, सुहाना आणि अब्राहम यांच्या स्टेडियममधील फोटोंनी चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम