भुसावळ दुहेरी खून प्रकरण: 6 आरोपी साक्री पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा...

भुसावळ येथील दुहेरी खून प्रकरणातील 6 आरोपींना साक्री पोलिसांनी एका ढाब्यावर अटक केली. त्यातील प्रमुख आरोपी कॉन्ट्रॅक्टर राजू सुर्यवंशी आणि त्याचा मुलगा रोहन सुर्यवंशी यांच्यासह अन्य चार आरोपींचा समावेश आहे.

घटनेच्या माहितीनुसार, हे आरोपी भुसावळमधील माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या हत्येतील संशयित आहेत. साक्री जवळील दहिवेल येथे शिवम ढाब्यावर जेवताना साक्री पोलिसांनी या आरोपींना पकडले.

आरोपींच्या ताब्यातून 10 मोबाईल आणि 54 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. जळगांव एलसीबीचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना ही माहिती देण्यात आली आहे. या कारवाईत API किरण पाटील, असई राजू जाधव आणि त्यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम