खासगी भागात सोने लपवणारी एअर होस्टेस अटकेत

बातमी शेअर करा...

एअर होस्टेसने खासगी भागात 1 किलो सोने लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न केला. केरळमध्ये या घटनेनंतर तिला अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.

तपशीलानुसार, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी २८ मे रोजी मस्कतहून कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या एअर होस्टेसकडे ९६० ग्रॅम सोने आढळले. या घटनेमुळे तिची चौकशी करण्यात आली आणि नंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवले आहे.

सोन्याची तस्करी करणारी टोळी केवळ या एअर होस्टेसवरच नाही तर केरळमधील काही व्यक्तींचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी अनेक वेळा तिने सोन्याची तस्करी केली असल्याचेही उघड झाले आहे.

एप्रिल महिन्यात, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर असाच एक प्रकार घडला होता. सीमाशुल्क विभागाने दोन परदेशी महिलांसह तिघांना साडेतीन किलो सोन्यासह अटक केली होती. त्या महिलांनी शौचालयामध्ये सोन्याची भुकटी लपवली होती.

या घटनांमुळे विमानतळांवर तस्करीच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे आणि अधिक कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम