महिनाभरात भुसावळ – पाचोरा थर्ड रेल्वे लाईन होणार सुरु, ताशी ९० किलोमीटर वेगात धावणार मालगाड्या….

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार २९ ऑगस्ट २०२२ । जळगाव-पाचोरा दरम्यान टाकण्यात आलेल्या तिसर्‍या रेल्वे लाईनीची पाहणी नुकतीच मुख्य संरक्षा आयुक्त मनोज अरोरा व अन्य अधिकार्‍यांनी दोन दिवसात पूर्ण केली. या लाईनीवरून डिझेल इंजिन लावलेल्या मालगाड्या ताशी ९०किलोमीटच्या वेगात रेल्वे प्रशासन चालवू शकते, काही किरकोळ त्रृटी आहे, त्या पूर्ण झाल्यावर साधारण महिनाभराने तिसर्‍या लाईनीचा उपयोग करता येणार आहे.

भुसावळ जंक्शनपासून संरक्षा विभागाच्या अधिकार्‍यांनी तिसर्‍या लाईनीची पाहणी गुरूवार, आणि शुक्रवारी या रोजी केली. यावेळी जळगावापासून अधिकारी हे सहा मोटर ट्रॉली गाडीने प्रत्यक्ष रेल्वे रूळांची पहाणी व पूलांची पाहणी केली होती. शुक्रवारी अंतीम पहाणी करून त्यांनी कामाच्या बाबतीत काही सूचना केल्या आहे, त्या सूचनानुसार दुरूस्तीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दोन दिवसांच्या पाहणी दरम्यान काही निरीक्षणांची नोंद करून त्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्यात. शुक्रवारी पाचोरा ते जळगाव या दरम्यान सात डब्यांची शेष गाडी डिझेल इंजीन लावून ताशी १२० च्या वेगात चालविण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली. यावेळी भुसावळ ते पाचोरा या मार्गाची पाहणी करून या मार्गावरून ताशी ९० वेगात डिझेल इंजीन लावून मालगाड्या चालविण्याच्या सूचना केल्या.. शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यत या मार्गाचे निरीक्षण करण्यात आले.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम