Lalbaugcha Raja 2022 First Look | लालबागचा राजा व मुंबईच्या राजाची पहिली झलक आज दिसणार…..

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार २९ ऑगस्ट २०२२ । Ganesh Chaturthi 2022 | यंदा दोन वर्षानंतर पुन्हा एकदा मुंबापुरीत गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. असं तर प्रत्येक गल्लोगल्ली त्या त्या ठिकाणचे राजे विराजमान होत असतात पण त्यातही लालबाग परिसरातील गणेशोत्सवाला विशेष मान आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजा व गणेशगल्लीचा म्हणजेच मुंबईचा राजा सुद्धा यंदा भक्तांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी मंडळाच्या वतीने आज बाप्पाची पहिली झलक दाखवली जाणार आहे. याविषयी लालबागचा राजा मंडळाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती देण्यात आली.व दरवर्षी लालबागचा राजा व मुंबईचा राजा हा ज्याठिकाणी विराजमान होतो तिथेच त्याची मूर्ती साकारली जाते. त्यामुळे आगमन मिरवणूक जरी नसली तरी हा प्रथम झलक दाखवण्याचा सोहळा अगदी उत्साहात पार पडतो. लालबागचा राजा मंडळाच्या सर्व अधिकृत सोशल मीडियाबावर भक्तांना घरबसल्या गणपतीचे दर्शन घेता येणार आहे. हा सोहळा आज २९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता पार पडेल यानंतर विशेष फोटोशूट होणार असून लवकरच बाप्पाचे फोटो सुद्धा पाहायला मिळतील. जर का आपल्याला लालबागच्या राजाची पहिली झलक लाईव्ह पाहायची असेल तर या लिंक सेव्ह करून ठेवा.

दरम्यान, आज मुंबईचा राजा म्हणजेच गणेशगल्लीचा राजा मंडळाने सुद्धा बाप्पाचे पहिले दर्शन आयोजित केले आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २७ ऑगस्टला आगमनाधीश चिंचपोकळीचा चिंतामणीची आगमन मिरवणूक पार पडली. ढोल- ताशे, आरत्या- गजरात धुंद होऊन भाविक या मिरवणुकीत तल्लीन झाले होते.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम