बिचुकलेंनी वेधले मुख्यमंत्री शिंदेंचे लक्ष ; केली हि मागणी !
बातमीदार | १२ नोव्हेबर २०२३
राज्यात नेहमीच बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणातून चर्चेत येत असतात. सध्या त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सिलेंडरच्या किंमतींविषयी पत्र लिहिले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आणि दिवाळीचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला 500 रुपयांत सिलिंडर उपलब्ध करावा अशी मागणी केली आहे. भाजपशासित काही राज्यात सिलिंडर 500 रुपयांत मिळत असताना महाराष्ट्रातही याच दरात सिलिंडर मिळावे अशी त्यांनी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीने राज्याचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान अभिजीत बिचकूले पुढे बोलताना म्हणाले की, पेट्रोल-डिझेलसह गॅस दरवाढीने भारतीय जनता गेल्या काही वर्षांपासून मेटाकुटीला आली आहे. त्याविषयी जनतेने वारंवार रोष व्यक्त केला. पेट्रोल-डिझेलच्या किंमती मे 2022 पासून जैसे थे आहेत. तर गॅस सिलेंडरच्या किंमतींनी हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने त्यात कपात केली. त्यामुळे सिलिंडर एक हजारांच्या घरात आले आहेत. तरीही जनतेला त्याची झळ बसत आहेच. मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील जनतेला मात्र ही झळ बसत नाही. हाच धागा पकडून आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी पण सिलेंडरच्या किंमतींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले आहे. काय आहे त्यांची मागणी?.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणातून चर्चेत असतात. सध्या त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सिलेंडरच्या किंमतींविषयी पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेत आलं तर 500 रुपयात सिलिंडर देण्याचे आश्वासन दिल्याचा दाखला दिला. 2014 पासून महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे. सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील याचा विचार करावा. 17 नोव्हेंबर रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील जनतेला 500 रुपयात सिलिंडर उपलब्ध करावा अशी मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पण सत्तेत सहभागी झाले आहेत. ते आता किती क्लीन आहेत, हे सरकारने दाखवून दिले. त्यामुळे अजित पवार यांनी देखील यामध्ये लक्ष घालून 500 रुपयात सिलिंडर महाराष्ट्रातील जनतेला उपलब्ध करावे, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम